STORYMIRROR

Sakshi Gourwar

Inspirational Others

3  

Sakshi Gourwar

Inspirational Others

कल्पनांची स्वप्ननगरी...

कल्पनांची स्वप्ननगरी...

1 min
298

कल्पनांचे स्वप्न गुच्छ कसे बांधावे मनी

सुंदरता त्यास येण्या हवी प्रयत्नांची संगिनी 

विचारांतून दिसावी आत्मविश्वासाची अंकणी 

तरच प्रत्यक्ष दिसेल नयनी कल्पनांची स्वप्ननगरी


मुल्य याचे विशाल इतके कसे मांडावे शब्दांतुनी

इच्छांची ही साखळी जुळे असंख्य प्रयत्नपाकळ्यांनी

स्वबळ असेल मजबूत तर अमर्याद संधींची ही पर्वणी

मेहनत,मनोबल अन् हाती यश अशी याची सुत्रसारणी

 

प्रत्येकाच्या इच्छांसाठी नैक दिशांची ही क्षेत्रांकणी

कला,कौशल्य,शिक्षणाच्या प्रवाहाची ही तरंगिणी

सुवर्ण पालवीने सजलेली स्वप्नांची ही कलानगरी

कल्पनांच्या नगरी दिसे कष्टकऱ्यांची गगनभरारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational