अनुभव आठवणींचा...
अनुभव आठवणींचा...
कंटाळवाणा आळस हा ऊठण्याचा
शाळा म्हटलं की नाक मुरडायचा
शाळेच्या वेळवरंच आम्हांस जागं करायचा
त्याच गडबडीत आमचा दिवस सुरु व्हायचा
आमचा आनंद म्हणजे रविवारचं असायचा
सोमवार आला की सगळा मूड जायचा
परत पहिल्या पाढ्यांचा आरंभ व्हायचा
नि पुन्हा रविवारची आतुरतेने वाट पहायचा
बाई शिकवताना मिनिटचं तासासारखा वाटायचा
केविलवाणा चेहरा करत नविन सोंग पत्करायचा
शाळा सुटण्याची आस धरुन वाट बघत बसायचा
घड्याळातचं बघत बघत हा तास संपुन जायचा
सुट्टीचं ते भान वेड सारा कटाक्ष त्यावरचं असायचा
सणसमारंभ आले की मोठा हर्ष जागृक व्हायचा
मन अतृप्त आसायचं कारण रविवार नाही पुरायचा
फक्त सुट्टीची आशा ठेवून अभ्यास करत रहायचा
सुट्टी जर मिळाली तर वेळ नाही समजायचा
निरागस कोवळ्या मनाला खेळ फार आवडायचा
आकाश लहान वाटावं पण घरचा अभ्यास मोठा दिसायचा
असा हा बालक शाळेच्या सुट्टीमध्ये रमायचा
