STORYMIRROR

Prashant Gurav

Abstract

2  

Prashant Gurav

Abstract

"खुंटी"

"खुंटी"

1 min
694

खुंटीची कल्पना आज झाली सपाट

ही तर पूर्वी होती कपड्यांचे कपाट


दादा, ताई, माई सगळ्यांच्याच

कपड्यांची लागायची भली मोठी रिघ

परंतु त्या खुंटीचा होता छोटासा परिघ


एवढ्याशा जागेत सगळ्यांना सामावून घ्यायची

त्या खुंटीची सर आजच्या कपाटाला नाही यायची


ज्यांनी-ज्यांनी खुंटीचे विश्व पाहिले

ते ते खरंच धन्य पावले


परत दिसेल का खुंटी जुनं ते सोनं ठरणारी

सिमेंट रूपी युगात पार लोप पावणारी


अहो, त्या खुंटीची काय वर्णू महती

जुन्या आठवणी पुन्हा-पुन्हा ताज्या होती |



Rate this content
Log in

More marathi poem from Prashant Gurav

Similar marathi poem from Abstract