STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Romance

3  

Vishal patil Verulkar

Romance

कधी कळेल तुला

कधी कळेल तुला

1 min
245

कधी कळेल तुला शब्दावाचुन प्रेम,

तुझ्या-माझ्या अंतरातील कसा हा गेम!!


प्रेमाची परिभाषा कशी कळनार तुला,

त्यासाठी थोडा वेळ बसून वेळ दे ना मला!!


कदाचित कळेल जेव्हा, सखे माझे प्रेम तुला,

तुझा माझा संसार थाटू रे माझ्या गुलाबाच्या फुला!!


डोळ्यात माझ्या तुझे डोळे, टाकून बघ प्रेम,

आभाळाएवढं प्रेम करतो मजनूसारखं सेम!!


हो म्हण एकदाचं मला चल दोघ लग्न करु,

तुझ्या माझ्या आयुष्यात एक नवा रंग भरु!!


किती दिवस चालणार चोरुन लपूनचा असा खेळ,

तुझ्या मागे लागून झाली माझ्या आयुष्याची भेळ!!


तुझ्या नकारातही मला दिसतोय होकार,

माझे स्वप्न बहुतेक होणार आहे साकार!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance