STORYMIRROR

Sarita Kaldhone

Classics

3  

Sarita Kaldhone

Classics

कालरात्रि

कालरात्रि

1 min
411

दुर्गेचे सातवे रूप 

कालरात्रिचा असे थाट

कृपा प्रसादाने उजळेल

भक्तांच्या आयुष्याची पहाट...


रौद्र चतुर्भुज तव मूर्ती 

हाती अभयमुद्रा, वरमुद्रा ,शस्त्र

 दैत्यांचा संहार कराया

उगारले खड्ग अस्त्र...


वाहन असे गर्दभ तव

रिद्धी सिद्धी करी प्रदान

विजेसम चमकणारी दृष्टी

देई भक्तांना वरदान....


कालिका मातेचा अवतार

भाविकांवर विशेष कृपादृष्टी

शुभाशीर्वाद देसी सकलांना

असे शुभंकराची वृष्टी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics