काळी पाटी
काळी पाटी
काय रेखाटू या पाटीवर
काळी पाटी काळा खडू ।
नशीबाचेच फेरे उलटे
जीवनात या सारेच कडू ।
टीचभर या पोटासाठी
हाता पायास किती छेडू ।
कोरभरच हवी भाकर
नको पेढे नको लाडू ।
अश्रू डोळ्यातले आटले
सांगा आता कसा रडू ।
