STORYMIRROR

bhondla bhondla

Classics

0  

bhondla bhondla

Classics

काळी चंद्रकळा

काळी चंद्रकळा

1 min
905


काळी चंद्रकळा नेसू कशी

पायात पैंजण घालू कशी


दमडीचं तेल आणू कशी

दमडीचं तेल आणलं


मामंजींची शेंडी झाली

भावोजींची दाढी झाली

सासूबाईंचं न्हाणं झालं

वन्सबाईंची वेणी झाली


उरलेलं तेल झाकून ठेवलं

हत्तीणीचा पाय लागला

वेशीबाहेर ओघळ गेला


सासूबाई सासूबाई अन्याय झाला

चार चाबूक अधिक मारा

दहीभात जेवायला घाला

माझं उष्टं तुम्हीच काढा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics