STORYMIRROR

Aishwarya Bansode

Tragedy

4  

Aishwarya Bansode

Tragedy

कालचा पाऊस

कालचा पाऊस

1 min
238

वेगळाच होता कालचा पाऊस....

थांबता ,थांबत न्हवता...कालचा पाऊस ...

पाऊस म्हणजे सृष्टीचा हुंकार ...

हिरव्या... निसर्गाचा आनंदी झंकार

जगण्याची दिशा अन

साऱ्या सजीवांची आशा

यावसा तर वाटतो...

तर कधी ओढ देतो..

      काल मात्र तो वेगळाच वागला

       स्वतः च्या अस्तित्वाच्या खुणा 

      सोडून गेला..

      अचाट... अफाट.. बेफामपणे

      वागला अन

      साऱ्यांच्या जीवात धडकी

      भरून गेला...

पिसाटल्या सारखा आला

राक्षसी ताकदीचा झाला

केला नाही विचार

पुढे काय होणार...

      धो धो बरसला

      आकांडतांडव केला

      कुणासाठी न कशासाठी

      क्षणभर विसावला

धारण केला रुद्रावतार

बेजार झाले पर्वत पठार

संपली क्षमता सोसण्याची

वेळ झाली कडे तुटण्याची

       काळाचे फासे अन यमाचे हसे

      गरिबांच्या बाबतीत..

      खोटे ठरतील कसे

      कष्टकरी... मेहनती..

      सुखाने झोपले

       ठाऊक कुठे त्यांना

      आखरचे आपले...

झोपेतच घास त्यांचा

का तू घेतलास

असा कसा तू

वेगळाच वागलास..

      पाणीच पाणी... सगळीकडे केलेस

      घरे दारे .. गुरे ढोरे...

      उघड्यावर आले

बा, पावसा...

जोडते मी.. हात तुला

करते मी विनंती....

मारझोड थांबव तुझी.....

       परत कधी आठवण नको

       नको अशी आततायीची हौस

      म्हणू नये कधी कोणी

       वेगळाच होता कालचा पाऊस.....  


Rate this content
Log in

More marathi poem from Aishwarya Bansode

Similar marathi poem from Tragedy