जशास तशे
जशास तशे
म्हणतात देवाने बुद्धी दिली फ़क्त माणसाला
विचार, विनय आणि विनम्रता दिली त्याला,
मग कलियुगाने माणूस इतका बदलावा,
की निर्माण करणाऱ्या निसर्गाला विस्कळित करावा?
स्वताच्या स्वार्थासाठी केली ना निसर्गाची हेटाळणी,
मग आता तरी नका करू ना येणाऱ्या पिढीची फेटाळणी.
पाऊस येत नाही म्हणून तुम्ही तक्रार करतात
मग झाड तोडून त्यासाठी देवाला साकड घालतात?
आयुष्य सुख- सोईचं करण्या ऐवजी चैनीच केलं,
स्वताच्या हौशी साठी नद्या ना केमिकल वापरून कुरूप केलं?
नैसर्गिक सौंदर्य सोडून कृत्रिम सौंदर्याने तुम्हाला मोहले,
स्वच्छ आणि सुंदर आकाशात कारखान्याचे धूर सोडले?
परंतु म्हणतात ना 'सत्य कधी पराजित नाही होत '
मुक्या पशु -पक्षी ना कोंडून ठेवणारे तुम्ही पाहत आहात ना आज कुठे बंद आहात?
हो, अगदी हेच सांगायचे होते मला
कोविड -19 हा निसर्गाचा चमत्कार आहे.
वाटत असेल ना आताच हे असे कसे ?
पण हे आहे जशास तशे !
