STORYMIRROR

anil matkar

Tragedy

3  

anil matkar

Tragedy

जीवनाची गत

जीवनाची गत

1 min
412

जीवनपूरक जीवन

त्यात अंधकार ठरला|

मुसळधार पावसांच्या सरीने

तू सारं काही नेलं||


पावसा तू एवढा कठोर कसा,

कठोरवानी वागलास|

तुझी नेहमी सोबत करुन

आमचा मात्र शेवट केलास||


कोमल हृदयाची तुझ्या

शिला कशी बनली

लहान लहान पोरं

आईपासून तोडलीस।


माणसांना बेघर केलसं

मुक्या जीवनाही मारलं।।


आयुष्याचा गाडा उजाड झाला

सारं काही संपल आता

वेगवान पावसाच्या सरीसोबत

हृदयाचं पाणी झालं।


भीषणमहापुराच्या लढाईत

जीवनाचं पानिपत झालं

मुसळधार पावसांच्या सरीने

तू सारं काही नेलं ||


Rate this content
Log in

More marathi poem from anil matkar

Similar marathi poem from Tragedy