जीव तुझ्यात रंगला
जीव तुझ्यात रंगला
तुझ्या मिठीत ही,
सांज अशी मावळावी.
खडीसाखर जणू,
पाण्यात विरघळावी.
या जगाच्या मालकाकडे,
मागणी अशी असावी.
ही धुक्याने झाकलेली वाट,
तुझ्या सोबतच सरावी.
एखाद्या धाग्यासारखा,
श्वास तुझ्यातच गुंतला.
नकळत असे कधी झाले,
पण जीव तुझ्यातच रंगला.