पाऊस आठवणींचा
पाऊस आठवणींचा

1 min

12.1K
हळूवार दाटून येणारा
हा सावळा अंधार
एक वेगळीच
चाहूल लावत आहे
जोरात सुटलेला
सोसाट वारा
गारव्याची जाणिव
करून देत आहे
बेभान कोसळणारे
पाण्याचे थेंब
अंगच नव्हे तर
मन ही भिजवत आहे
अश्रूंशी मिसळणारा
हा पाऊस
आठवण तुझी
करून देत आहे