STORYMIRROR

Ashleah Made

Tragedy

3  

Ashleah Made

Tragedy

जगावं कसं

जगावं कसं

1 min
24

रोजगार गेला भाकरी गेली 

आता जगावं कसं? 

माझ्या एकट्याच्या हाताने घर चालतं 

आता मरावं तरी कसं...? 


बायको-मुलांची भूक मिटवायची 

त्यांचं पोट भरावं कसं? 

बाहेर निघणं कठीण झालं 

भाकरी शोधावं तरी कसं? 


होतं-नव्हतं सगळं संपलं 

जेवण बनवायचं तरी कसं?

कमवलेले पैसे ही संपले

आता पैसे ही कमवावं कसं? 


खरंच काय दोष आम्हा गरिबांचा 

कुणासमोर रडावं तरी कसं? 

या महामारीमुळे एकच प्रश्न

आता जगायचं तरी कसं...?


Rate this content
Log in

More marathi poem from Ashleah Made

Similar marathi poem from Tragedy