जाई गालात हसते
जाई गालात हसते
अंगणात फुलला गुलाब
मोगरा दुरून हसतो।
जास्वंद मिरवतो डोलात
खुशीत चाफाही दिसतो।
बहरली कशी रातराणी
गंध तिचा दरवळतो।
गार गार वाऱ्या संगे
निशिगंधही सळसळतो।
उघडून डोळे मग बघते
शेवंती पाणाआड़ दडते।
लाजत मुरडत कशी ती
जाई जुई गालात हसते।