जागलं नां....
जागलं नां....
तुझ्या गोऱ्या चेहऱ्याचं काय
करु तुझं मनच चांगलं ना...
किती मारल्या तू माझ्या प्रेमाला लाथा
सांग कुठे गेल्या तुझ्या प्रेमाच्या शपथा
तुझं प्रेम कधी माझ्या प्रेमात जागलं ना....
देव भरो तुझी सखे सुखाने झोळी
माझी झाली दुखाने दुनिया काळी
दु:ख दिलं तू मी तुझं कधी मन ठगलं ना....
ना माझ्याकडे तुझ्याइतकी धन दौलत
हात रिकामे माझे मला तुझ्या प्रेमाची लत
मी तुझ्या प्रेमात कधी सुख भोगलं ना....
