STORYMIRROR

Rekha Dixit

Abstract

3  

Rekha Dixit

Abstract

इंद्रधनु

इंद्रधनु

1 min
205

आयुष्यही असेच असावे इंद्रधनुच्या रंगांपरी 

आठवांचा मोगरा बहरावा तुझ्या सुगंधापरी

मंद धुन यावी बासुरीची धुंदवणारी

ओढ तव भेटीची मनी जागवणारी 

अबोल माझी प्रीत ह्रदयातून झरणारी 

तना-मनातील भाव नयनी पाझरणारी 

साद तुझी ऐकताना अंग अंग चेतविणारी 

पहाट वारा फुलांसवे गुंजारव भ्रमरापरी

चिंब पावसात भिजूनी मोहरणार्या लतेपरी

आठवताच प्रथम स्पर्श लाजणार्या बकुळीपरी

शब्द तुझा दिन-रात मनी प्रेमगीतापरी 

ह्रदयी तुझा आठवावा संग गुलाब अत्तरापरी

वाटे तुला बिलगावे अखंड समुद्र लाटांपरी 

मी माझी न रहावी तुझ्यातच विरघळावे दुधातील साखरेपरी

इंद्रधनुच्या रंगांसम मिलन व्हावे प्रीती संगमापरी

शुभ्र धवल प्रकाशाचे गीत गावे जीवनभरी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Rekha Dixit

Similar marathi poem from Abstract