STORYMIRROR

Rekha Dixit

Others

4  

Rekha Dixit

Others

एकरूप

एकरूप

1 min
155

क्षणोक्षणी पदोपदी सय तुझी, लोभस रुप तसा स्वभावही

तू सतत जवळी,जगणे सुसह्य होते जाणवत्या अस्तित्त्वानेही 

प्रेम असे हे वेडे खुळे,मानतच नाही तुझे जाणे

तन मन धन सारेच अर्पूणी तुझेच रे जगते जिणे 

असे कसे हे जुळले नाते,अंतरी अंतराचे गहरे

श्वासाश्वासातूनही अजून जगते अस्तित्व तुझेच रे

कधी सुखाच्या क्षणी,कधी दु:खाच्या क्षणी

कधी खळखळलो,कधी आसवात नाहलो दोन्ही क्षणी

दोन शरीरे भिन्न परी मने मनाशी जुळली

आयुष्याची गाडी मग सुसाट वेगे धावली

माहित होते कोण आधी आणि कोण नंतर

ईहलोकीची यात्राही नच असे निरंतर

तू खरच भाग्यवान,अतिप्रिय ईश्वरासीही

मी एकटी कशी?अनंत आठवणी तुझ्या मजपाशीही 

क्षणोक्षणी आठव तुझी भरुन येतो उर

आहेस माझ्या ह्रदयी कितीही असशी दूर दूर


Rate this content
Log in