STORYMIRROR

Tukesh Khandare

Romance Others

3  

Tukesh Khandare

Romance Others

गुन्हा

गुन्हा

1 min
259

चल आज मला एक गुन्हा करू दे.

निलाजरा होऊन, तुझा हात धरू दे.


मोजला तुझ्यासाठी एकेक श्वास मी माझा.

त्या श्वासांनाच आठवणीत थोडंसं उरू दे.

सागर किनारा...

आणि वेळूच्या बनाला जाणं नकोसं आता,

पण तुझ्या स्वप्नात मात्र, खरंखूरं फिरू दे.


चल आज मला हा एक गुन्हा करू दे.

कोंडलेल्या आसवांना एकदाचं झरू दे.


उभ्या मैफिलीत जगाच्या एकटाच मी 'एकटा'

या एकटेपणाला आता जरा मागे सरू दे.

दुःखाची चाहूल...

आणि विरहाची कुजबुज; ऐकणं नकोच आता!

वेचलेल्या या क्षणांना, तू सुखाने भरू दे.


चल आज मला, एक गुन्हा असाही करू दे.

चोरलेल्या तुझ्या मनाला, पुन्हा एकदाचं चोरू दे.


ही चोरी नसे माझ्या एकट्याचीच,

पण तुझ्याही चोरीला; जरा नजरेत भरू दे.

मनाचा डाव...

आणि भावनांचा खेळ, हे थांबव आता,

आणि सरणाऱ्या या डावात, मला एकदाच उतरू दे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Tukesh Khandare

Similar marathi poem from Romance