गर्जा महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा


गर्भात मारल्या जाणाऱ्या जिजाऊ आता नक्कीच वाचतील
आणि भविष्यातील शिवबांच नेतृत्व त्या करतील..!
राजे तुमचे मावळे आता नक्कीच व्यसन मुक्त होतील
आणि तुमच्या विचारांचा झेंडा पुन्हा हाती घेतील..!
वृद्धाश्रमाकडे जाणारी पाऊले आत्ता पुन्हा घराकडे वळतील
आणि जिजाऊंच्या संस्काराचा वारसा अटकेपार न्हेतील..!
राजे तुम्हाला तुमच्या मावळ्यांचा वाटल पुन्हा अभिमान
असा महाराष्ट्र घडवू आम्ही अशी देते तुम्हाला आण..!
मग पुन्हा गर्वाने म्हणूयात महाराष्ट्र माझा
दिल्लीचेही तख्त राखतो गर्जा महाराष्ट्र माझा..!