गंध तुझ्या प्रीतीचा
गंध तुझ्या प्रीतीचा
कैफ तो किती असावा
कालच्या धुंद रातीचा
शहारलेली गात्र सांगती
गंध तुझ्या प्रीतीचा
भ्रमर होऊनी प्राशला
मकरंद या अधराचा
थरथरते ओठ सांगती
गंध तुझ्या प्रीतीचा
कुसुमपाकळ्या खुलल्या
वर्षाव होता चुंबनाचा
आरक्त लाली सांगते
गंध तुझ्या प्रीतीचा
वसंतवारे भरले देही
दोष मोहरत्या स्पर्शाचा
तृप्त होऊनही अतृप्त
गंध तुझ्या प्रीतीचा
उत्कट भाव अजुनही
एक झालेल्या श्वासाचा
निश्वासातून उमटतो आहे
गंध तुझ्या प्रीतीचा

