एक अपेक्षा
एक अपेक्षा
घरच्यांची एक अपेक्षा होती
अपेक्षेनुसार पुत्र व्हावा....
अपेक्षांची ओझी वाहताना,
अपेक्षाभंग न त्यांच्या नशिबी यावा..
मग अपेक्षांच्या अग्निकुंडात,
अपेक्षांचा यज्ञ झाला...
अपेक्षांच्या आहुतीनंतर,
अपेक्षेनुसार माझा जन्म झाला...
अपेक्षांनी बालपण सरल,
तरुणपणी अपेक्षांनी घेरल...
अपेक्षेवाचून काही न उरल,
अपेक्षांनीच मातीत पुरल...
मातीत गाढल अपेक्षांनीच,
उरल्या फक्त अपेक्षाच...
अपेक्षा, अपेक्षा, अपेक्षा
आणि फक्त अपेक्षाच...
माझी ही एक अपेक्षा होती,
ती अपेक्षा मला मिळावी...
अपेक्षेनुसार किमया व्हावी,
प्रीत आमची जुळावी....
पूर्ण होईल का माझी अपेक्षा...?
ही कुठल्या जन्माची शिक्षा...?
पदरी पडले का प्रेम भिक्षा...?
अजुन किती दिवस प्रतीक्षा...?
कधी अपेक्षा मला भेटेल...?
माझ्या अपेक्षाच म्हणनं तिला पटेल...
माझी हीच ती अपेक्षा आहे रे...
म्हणून कधी मिठीत माझ्या खेटेल..
मिठीत माझ्या खेटेल...
