दिसते लय भारी
दिसते लय भारी
नेसून साडी गुलाबी परी
दिसते लय भारी स्वप्नातली परी....
चांदण्याच्या शाळेत तिला पाहिली,
चॉकलेटच्या बंगल्यात खिडकीत उभी
रंग तिचे उडती फुलपाखरावरी,
दिसते लय भारी स्वप्नातली परी....
नकळतच बट येते गालावरी,
प्रेम माझे दिसले तिच्या नयना मधी
हसताच उठती तरंग पाण्यावरी,
दिसते लय भारी स्वप्नातली परी.....
भेट तिची झाली सपना मधी,
जादू तिने केली मकरंदावरी .
नाचतो हा मोर तिच्या पदरावरी ,
दिसते लय भारी स्वप्नातली परी....

