धुंद एकांत क्षणी
धुंद एकांत क्षणी
धुंद एकांत या क्षणीनको दावुस बहाणेतुला समजण्या मीहीआता झालीय शहाणे
बघ सांजवेळ झालीघेते हाती तव हाततुझी माझी राहो सदानित्य प्रेमळ ती साथ
स्मृती अजुनी आहेतताज्या समुद्र तटीच्यागाज तयाची सांगतेआठवणी अंतरीच्या
राहो अशाचअपुल्याऋणानुबंधाच्या गाठीओढ राहील सदाचीस्नेह सदानंदा साठी
हेच मागणे देवासअशा एकांत क्षणालामार्ग सुखाचा चालूयामिळो स्वर्ग सुख तुला