STORYMIRROR

उमेश तोडकर

Classics

3  

उमेश तोडकर

Classics

देवी कत्यायनी

देवी कत्यायनी

1 min
129

अश्विन शुद्ध षष्ठी

दिवस सहावा नवरात्रीचा

सोनेरी तेजस्वी वर्णाच्या

देवी कत्यायनी च्या पुजनाचा


दुर्गेचे हे रूप सहावे

ऋषी कत्यायनांच्या घरी प्रकटले

कन्या रूपी जन्म घेतला

कत्यायनी हे नाव मिळाले


चार भुजांची ही देवता

एका हाती आशिर्वाद देते

दुस-या हाती अभय

तिस-या तलवार चौथ्या कमळ


करता उपासना साधकाला

होते धर्म अर्थ काम मोक्षाची प्राप्ती

नष्ट होते एका क्षणात

रोग शोक संताप भय


देवीचे हे रूप आगळे

प्रतिक आहे संयम साधनेचे

कत्यायनी देवीच्या उपासनेने

जिवन सुख समृद्धीने भरते



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics