दैवी इच्छा
दैवी इच्छा
नाही गवसनार भगवंत तुम्हाला राऊळात
त्याचे अस्तित्व आहे हरएक प्राणीमात्र आणि चराचरात
नका राहू तुम्ही मोक्ष आणि भगवंतभेटीच्या संभ्रमात
प्रत्येक क्षणी जागृत आहे तो तुमच्या हृदयात
नाही लागत देवाला धूपदीपांंची माळ
नकोय त्याला श्रीफळ आणि नववस्त्रांची थाळ
भगवंतााला वाटते कधीही न तूटो तुमची समाजकल्याणासाठीची नाळ
कुंकूगुलालाच्या मळवटाऐवजी हवय त्याला सत्कर्माचे भाळ
नकोय देवाला त्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार
नवशोधांंमार्फत हवाय त्याला मानवाचा उद्धार
भटकतात जे चिमूरडे आणि मुके जीव निराधार
देवाला एकच वाटते कि बनाव तुम्ही त्यांचा आधार
नको भगवंताला स्वतःला कट्टर धार्मिक म्हणवणारे धर्मगुरु
हवा त्याला समाजसुधारकांचा अखंड प्रवास सुरु
चला तर मग, देवाज्ञानुसार सर्वांनी एकजुटीने काम करू
सगळे मिळून फुलवू आनंद आणि समृद्धीचे छायादार तरु ......
