STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

चित्तार्‍या चितरें

चित्तार्‍या चितरें

1 min
15.4K


चित्तार्‍या चितरें काढी भिंतीवरी ।

तैसें जग सारे अवघे हें ॥ १ ॥


पोरें हो खेळती शेवटीं मोडिती ।

टाकूनियां जाती आपुल्या घरा ॥ २ ॥


तैसे जन सारे करिती संसार ।

मोहगुणें फार खरें म्हणती ॥ ३ ॥


कैसी जड माती चालविली युक्ति ।

नानापरी होती देह देवा ॥ ४ ॥


कांहीं साध्य करा साधुसंग धरा ।

नाम हें उच्चारा नरहरी म्हणे ॥ ५ ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics