चाटे
चाटे
साऱ्या बहाद्दरांचे, पाठीत वार झाले
गाफील राहिल्याने, मागून फार झाले...
आता उगी कशाला, सत्कार पामराचा..
थुंकून चाटणारे, चाटे चिकार झाले..
होती जरी जिवाला, त्याचीच घोर चिंता
त्याच्याच वागण्याचे, अप्रूप फार झाले ..
आता नको मला ती, उसनी सहानुभूती
बाका प्रसंग येता, सारे पसार झाले..
सारेच हाडवैरी, आता तुलाच प्यारे..
माझेच वागणे का, डोक्यास कार झाले
