STORYMIRROR

Prachi Mulik

Romance

4  

Prachi Mulik

Romance

चांदरात

चांदरात

1 min
448

अंबरास चांदण्यांचा सहवास करी धुंद

तेजाळली चांदरात निथळून येई मंद


रानोपानी ठायीठायी चंद्र उतरला बाई

सजणाच्या सोबतीनं अंधाराला जाग येई


फुलापानी कुजबुज दाटून ही आली लाज

नजरेनं नजरेची भाषा ओळखली आज


पेटलं वेड तुफान शहारलं रान सारं

उरी दाटल्या उधाणा जाणिवांची ग किनार


ओठांवर कबुलीस ओठांनीच कैद केलं

गुलाबी उधळण रानी गात्र गात्र मोहरलं


पाचोळ्याची कुरबूर बावरली रानवेल 

काजव्यांच्या प्रकाशात दिसे केवडा नितळ 


पहाटे पहाटे येई रानी मोगरा बहर 

अडकूनी मिठीमध्ये झाला मधाळ प्रहर 


झुंजूमुंजू होता दिशा रान भानावर आलं 

उतरल्या चंद्रालाही मिठीच अडवी कोडं.. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance