कुंपण
कुंपण
1 min
371
काटेरी कुंपणावर
ओढणी पुन्हा पुन्हा जाऊन
लपेटून घेत होती..
त्याला ही आणि
स्वतःलाही..
तिला अलगद
सोडवून घेतानाही
किती रुतून
बसत होते कुंपणावरचे काटे..
मी वाऱ्याला
नको तितके
बोल लावत राहिले..
कुंपण रंगीत होत गेलं
तिच्या अडकून राहिलेल्या
धाग्यांनी..
आणि ओढणीवर
चितारत गेली
न मिटणारी नक्षी..
दोघांची सलगी
मला जरा उशीराचं समजली..
तुझ्या आठवणींवर
पुन्हा पुन्हा जाऊन
मन स्वतःला
लपेटून घेत राहिलं तेव्हा...
