बीरसा मुंडा
बीरसा मुंडा
वीरया मुंडा तुला सलाम
कुणी न लिहीला तुझा इतिहास
तुच जंगलचा राजा
या भूमिचा आदिपुत्र
तू लढला अधिकारासाठी
तुझ्या जंगलासाठी
वेठबिगारी साठी
अन्यायावर पेटून उठला
दुष्काळात बांधवांना पोसलेस निष्ठेने
मिशनरींचे शिक्षण सोडून
बांधवांना स्वधर्मी घेतले
"सिंगबोंगा" शक्ती मानली श्रेष्ठ
भूतपिशाच, जादूटोणा
मद्यमांसा देवून नकार
डोमबावरी वरी पेटविली क्रांती
हजारो बांधवा पाठीशी घेवूनी
झुंजलास वाघ तू इंग्रजांशी
तिरकमठ्याने लढले शूरवीर
सक्तमजुरीची शिक्षा भोगूनी
तू दिलास मंत्र, उलगुलान स्वातंत्र्याचा
वीर मरण पत्करूनी
तू झाला अमर शूरवीर जगती
