STORYMIRROR

कवी श्रेयस

Tragedy Others

4  

कवी श्रेयस

Tragedy Others

भावनांची माझ्या

भावनांची माझ्या

1 min
281

 भावनांची माझ्या आज होळी इथे पेटली होती 

ती न बोलताच मला निघून गेली होती

भावनांची माझ्या आज होळी इथे पेटली होती 


दिवा लावला होता मी अंधार दूर करण्या  

त्याच दिव्याने झोपडी माझी जळली होती

भावनांची माझ्या आज होळी इथे पेटली होती


अवती भवती झोपडीच्या माझ्या अदयाप गर्दी जमली होती

वेळ होताच सर्व गर्दी पळ काढून पळत होती

भावनांची माझ्या आज होळी इथे पेटली होती


कुणीही न कुणाचे सर्व गर्वाने बांधलेली गाठोडे होती 

गर्व माझ्या ही सावलीला झाला तिनेही साथ सोडली होती

भावनांची माझ्या आज होळी इथे पेटली होती


किती ही भावना मी जपली होती

शेवटी ती ही रुसली होती 

भावनांची माझ्या आज होळी इथे पेटली होती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy