जाण्याने तुझ्या
जाण्याने तुझ्या
1 min
215
जाण्याने तुझ्या थरकाप माझ्या मनाचा होईल
रक्ताच्या उलट्या करून हृदय माझं बंद होईल
पाहिलेली स्वप्न सगळी तीतर बितर होईल
मनातल घरट माझं तुटून जाईल
घरट्यातील पाखरू मरून जाईल
जीवाची तगमग होईल
जाण्याने तुझ्या थरकाप माझ्या मनाचा होईल
रक्ताच्या उलट्या करून हृदय माझं बंद होईल
भावना माझ्या जिवंत जळून आत्महत्या करतील
रडायला सगळ जग जाग होईल
स्वप्नातलं जग माझं सुन्न सुन्न होईल
वाटेवरच्या पाऊल खुणा माझ्या मिटून जातील
जाण्याने तुझ्या थरकाप माझ्या मनाचा होईल
रक्ताच्या उलट्या करून हृदय माझं बंद होईल