STORYMIRROR

anjali shrivastav

Tragedy

3  

anjali shrivastav

Tragedy

बदलत गेली आई

बदलत गेली आई

1 min
122

बाबा गेल्या पासून

आई 'आई' राहिलीच नव्हती

बदलत गेली आई..

ओढायची जपमाळ

दिवसातून कितीदा तरी..

दोन चिमटीत धरुन

काढायची रांगोळी

मनाजोगती येत नाही तोपर्यंत..

चेहरा धुऊन झाला की

सवयी नुसार जायचा हात

तिचा दोन भुवया मध्ये 

कुंकूवाच्या जागेवर...

कुंकवानं जागा सोडली

उशीरानं जाणवायचं तिला...

कोरभर भाकर चघळत

रहायची बळंबळं

घास ढकलायची पोटात

कसातरी...

डोळे टक्क उघडे ठेवून

झोपायची कूस बदलत..

मोजायची बोटांवर

रोज रात्री काही तरी...

काय मोजत होती ती?

आयुष्यातले शिल्लक दिवस

की...

बाबांना भेटण्याचा क्षण...


Rate this content
Log in

More marathi poem from anjali shrivastav

Similar marathi poem from Tragedy