अशी मी
अशी मी
एक माझाच इतिहास
डोळ्यासमोरून निघून गेला,
ओलावले थेंब नजरेतले
हळूच गालावर ओघळला,
स्पर्श तुझा विसरला नव्हता,
सहवास ही तुझा भावला होता,
कसं सांगू तुला मन माझं,
मला माझाच भूतकाळ छळत होता,
काही क्षण विरून गेले
निःशब्द मन माझे अन मी
नवीन विचारांनी फुलले,
जगले भावना माझ्या मी,
जाग आली जेव्हा मनाला
तुझेच विचार येत होते
ओठावर नाव तुझेच फक्त
सारखे येऊन जात होते,
कृष्णालीला सख्या तुझ्या
भावल्या ह्या वेड्या मनाला
स्वप्न तुझी पाहते लोचनी
काय म्हणू मी ह्या प्रेमाला,
काळ्या अवकाशातही
जांभळा प्रकाश दिसतो,
एक आशेचा ठिपका जसा
तसा तू मला भासतो,
तुझ्या सोबत कायम आहे
कसे तुला पटवून देऊ
एकच मागणे माझे पूर्ण कर
मी नसले तरी दुःखी कधीच नको होऊ
अजून खूप काही लिहायचे आहे
तुझ्यावर खूप प्रेम करायचे आहे
सर्व काही तुला देऊन मग
शांत तुझ्या कुशीत विसवायचे आहे

