पाऊस
पाऊस
1 min
194
पाऊस आठवणींचा,
पाऊस स्वप्नातला,
पाऊस थेंबांच्या रेघांचा,
पाऊस आपल्या मनातला,
कधी खूप तीव्र असतो,
न थांबणाऱ्या आठवणींसारखा,
कधी मुसळधार कोसळतो,
डोळ्यातील वाहणाऱ्या अश्रूंसारखा,
अलगद पडतो कधी रिमझिम,
इंद्रधनू च्या सोबतीने,
मनही मग होते तुफान बेफाम,
जागेपणी पडलेल्या स्वप्नाने,
कधी प्रत्येक क्षण त्याचा असतो,
जलधारांची एक एक रेघ जणू,
आयुष्यही तसच घडवत राहतो,
असते अनुभूती अनुभवांची जणू,
प्रत्येकाच्या मनातला पाऊस वेगळा खरा,
भिजणाऱ्या मनाच्या आनंदात रुजणारा,
कोणाच्या लेखणीतून बरसतात सरी,
तर कोणाला भिजण्याचे संकट भारी,
त्याच्या सरींमध्ये लपतात किती गोष्टी,
डोळे ही लपतात अश्रू भरलेली दृष्टी,
आनंद कोणाचा असतो ओसंडत,
तर मनातून कोणी असते बहरत,
पाऊस मात्र स्वतः त्याच्या मर्जीनेच वागतो,
ज्याला जसा हवा तसाच तो असतो,
