पाऊस
पाऊस
1 min
164
तो आला आणि धो धो कोसळला,
मी चिंब भिजत उभी राहिले,
माझं भिजणं बघून तो हळूच थांबला,
मी मात्र मनात खूप खोल गेले.
विचारांचा गडगडाट आता
कानावर ऐकू येत नव्हता,
त्याचे हळू हळू बरसत होता
मी त्याच्या कडे बघत होते रडता रडता,
पाऊस नक्की कसला होता,
अश्रूंचा की विचारांचा,
माझा मलाच कळत नव्हता,
बंध माझ्या मनाचा.
बराच वेळ आम्ही दोघे बरसत राहिलो,
एकमेकांना सोबत करत राहिलो,
पूर्णपणे एकरूप होऊन गेलो,
अश्रू आणि थेंब भेद ही विसरलो.
पाऊस आता पूर्ण थांबला,
विचारांचा गोंधळ ही
क्षणात दोन्ही झाले मोकळे
मन आणि आकाशही.
