असा कसा रे !माणसा!
असा कसा रे !माणसा!
असा कसा वेडा पिसा
झाला रे तू माणसा
स्वतःच्या स्वार्थापायी
वृक्षतोड करते रे कसा
मोठमोठे वृक्षाला केले
तु पूर्णताः नष्ट
हीच तुझी नीतिमत्ता
कसा झाला शिस्ट
अरे लहानापासून मोठ्यापर्यंत
वाढविले याच वृक्षांनी
सावली फळे फुले दिली
याच खऱ्या सवगंडयानी
विज्ञानाच्या आसे पोटी
झाला रे तू मदहौस
सुंदर वृक्षवेली नष्ट करीत
पुरविते स्वत:ची हौस
शिकला सवरला असतांना
सोडते नदीपात्रात सांडपाणी
अस्थी -विसर्जन राख शिरविते
समजते स्वतःला मोठा ज्ञानी