STORYMIRROR

Kishor Chaure

Tragedy

4  

Kishor Chaure

Tragedy

अन्यायाची परिसीमा...

अन्यायाची परिसीमा...

1 min
357

खस्ता खात जगतांना 

जखमांना अक्षरशः खपल्याही येत नाही...

अन् जगण्याचा खरा आनंद

कुठे कसाच नजरेस पडत नाही...


सकाळ, दुपार, संध्याकाळ अन् काळोख्या रात्री

होत असतो सारखा अन्याय तरीही मनास जाग कशी येत नाही...

अन् ह्या अन्यायाच्या लख्ख प्रकाशात

न्यायाचे कधी द्वारच उघडत नाही...


समाजातील प्रत्येक घटक अन् घटक पेटून उठतो जीवावर सदैव

पण एकदाचा पेटवून काहो टाकत नाही..?

तेच रडगाणे रोजचेच तीच उपेक्षा दीनचीच

एकदाचे सर्व संपवून टाकण्याचे धाडस का हो नाही..?


किती पिळलो, गेलो किती छळलो

अन् तरीही ह्या होणाऱ्या वेदनांचा आक्रोश तोंडून फुटतं नाही...

आता नाहीच सहन करायचा हा दुराचार अन् पेटून उठलो

पण मलाच दुराचारी का होता येत नाही...


कितीही प्रयत्न केला विद्रोह करण्याचा 

मात्र विद्रोहाची भाषाच तोंडून फुटत नाही...

आता मात्र एकदाची संपूच दे सहनशीलतेची परिसीमा

मग एकही तिळमात्र अन्याय कदापिही सहन करणार नाही...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy