अबोल प्रीत
अबोल प्रीत
निखळ हास्य ओठी तिच्या
उथळ फार ती बोलत नसे.
डोळ्यांत भाव बोलके असूनही
व्यक्त काही ती होत नसे.
तोच वेडा ठार ठरतो
कैक बहाणे करु पाहतो
कोषात अडकलेल्या तिला
अलगद हळूवार फुलवू पाहतो.
बघता बघता संवाद ही होतो
शब्द भावनांचा आधार बनतात
एकाकी असलेल्या तिच्या मनाची
मग अबोल प्रीत बहरत जाते.

