अबोल प्रीत
अबोल प्रीत
तू चंद्र म्हणवून घेतोस स्वतःला...
तुला काय कळणार त्या कलत्या
सांजेची हुरहूर...!
सूर्याचा दाह सोसून ती तूझी
वाट पाहत असते..
तुझ्या शितलतेसाठी,
मिट्ट अंधाऱ्या काळोखात
निरव शांतता शोधत असते बिचारी....
पण तू, तू तर मशगुल असतोस चांदण्यांच्या गराड्यात , जिथं
तुझ्या सौम्य प्रकाशाचं कौतुक होत असतं...!
पण तुझी वेळ तर त्या कलत्या सांजेपायी आलेली आहे हे सपशेल विसरून तू धुंद असतोस स्वतःच्या विश्वात आणि ती...
ती बिचारी वाट पाहत असते तूझी...!
कधीतरी तिला अनुभवून पहा....! कलणाऱ्या सांजेला,
निसटत चाललेल्या वेळेला थोड थांबवून पहा.... स्वप्नातून तू बाहेर येशील...!

