STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Romance

3  

NIKHITA DAKHORE

Romance

अबोल प्रेम

अबोल प्रेम

1 min
245

मी तुझी अन् तू माझा 

ओढ कशी ही लागली...


ध्यास तुझा हा असा कसा

झुरवी तुला अन् मलाही...


अबोल तू अन् अबोल मीही 

शब्दाविना का खेळ हा...


नि:शब्द प्रित किती दिवस अशी 

तू तरी बोल ना...


कळते मला प्रेम तुझे

भावना माझ्या कळतील का...


गुपीत तू तुझ्या हृदयीचे

माझ्या समीप तू खोल ना...


हृदयी माझ्या उठे

भाव तरंग 

ओढ तुझ्या मिलनाची...


सांग तुला

आस का माझ्या भेटीची...


मी तुझी अन् तू माझा

ओढ अशी ही लागली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance