आयुष्याची गती
आयुष्याची गती
आयुष्याची गती । मोठी आहे भाऊ ।।
तडफड ठेवू ।।। अंतरात ।।१।।
घरी सुना पोरे । बोलती टोकाची ।।
गर्जना ढगाची ।।। होई तैशी ।।२।।
दिसतो घरात । आम्ही अडगळ ।।
होई मळमळ ।।। बघ त्यांना ।।३।।
रंग दिले आम्ही । कुटुंबाला सदा ।।
येई तरी गदा ।।। जीवनी या ।।४।।
वाटे माया खरी । वृध्दाश्रम असे ।।
जग शुन्य भासे ।।। व्यथेने या ।।५।।
येते साऱ्या जना । वार्धक्य शेवटी ।।
तोडू नये रोटी ।।। त्यांची कधी ।।६।।
येई जरी आम्हा । एकाकी जीवन ।।
हास्याचे रान ।।। पेरू चला ।।७।।
आभाळ कोसळे । वृध्दावरी जरी ।।
ठेवा देव मनी ।।। जगायला ।।८।।
