आठवण
आठवण
आजच्या चांदणीत एक अनोखी शांतता भासते
डोक्यावरच्या नभाकडे एक वेगळीच ओढ खेचते
वा-यामधली शीतलता का आकस्मिक गोड वाटते
कारण मला तुझी आठवण येते
इतका विचार करुनही तुझ्यासमोर बोलवत नाही
या प्रेमळ अबोल्याला वाचा काही फुटत नाही
कधी मोकळे करीन मी माझ्या मनाचे हे ओझे
आता मलाही शांत रहावत नाही
वेध लागलेत भेटायचे या जीवाला त्या जीवाशी
वाट पाहतोय दोघेही त्या नाजुक क्षणाची
कधी भेटू, कधी बोलू, कधी होईल दोघांचे मिलन?
प्रीतीत रुजलेल्या या शब्दांना आता मात्र अबोला गाठणार नाही.

