आठवण
आठवण
अविरत पाऊस पडताच आठवण तुझी आली
नकळत या जीवाला ओढ तुझी लागली
प्रेमळ त्या दिवसांची साठवण झाली
आता काय ती वेळच निघुन गेली
तू कधी मनापासुन बोलला नाही
मी ही कधी समजुन घेतलं नाही
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आनंदाचा
आता तु नाही सोबत हा काळ फक्त आठवणींचा....

