महाराष्ट्र आमचा
महाराष्ट्र आमचा
1 min
113
महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र आमचा
अभिमान आमचा स्वाभिमान आमचा
माय मराठी माझी भाषा
भाळी शोभे राष्ट्र प्रेमाची रेषा
सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा
साहसाची तेजस्वी आग आमुच्या अंगा
शूरवीरांची ही मातृभूमी
शौर्याची आहे ही कर्मभूमी
छत्रपतींचा इतिहास रोमांचकारी
मराठी माणुस आहे लयभारी
संताची ऐकतो आम्ही गाथा
मानतो ज्याला तिथे टेकतो माथा
जाती- धर्म आहे अनेक
पण आहोत आम्ही सर्व एक
