STORYMIRROR

Madhuri Sharma

Others

3  

Madhuri Sharma

Others

कुणीतरी असेल ना

कुणीतरी असेल ना

1 min
165

कुणीतरी असेल ना....

माझ्या या आयुष्यात कुणीतरी असेल ना असा

ज्याचा ध्यास मी

ज्याची आस मी

ज्याचा विश्वास मी


कुणीतरी असेल ना

मला ओंजळीत घेणारा

मला आनंद देणारा

माझा हात हातात घेणारा

फक्त माझ्यासाठी झुरणारा


कुणीतरी असेल ना

ज्याला असेल माझी ओढ

ज्याचा नसेल कोणी तोड

ज्याला असेल सर्वांचा वोट


कुणीतरी असेल ना

जो फक्त माझा असेल

ज्याला माझ्याव्यतिरिक्त कोणी महत्वाचं नसेल

असा कुणीतरी असेल ना....


साहित्याला गुण द्या
लॉग इन