Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishal patil Verulkar

Tragedy Others

3  

Vishal patil Verulkar

Tragedy Others

आई

आई

1 min
261


क्षमा मागतो आई ,

अपराधी मी नाही

जन्म दिला तु आई ,

चुकलो मी क्षण नाही ...

सोडून मज एेकट

गेली कुठे तु आई ,

कंठ दाटला मनात

ऊर भरुन येई ...

कशी होती तुझी माया

अनुभवली मी नाही ,

तरी तुझी आस आहे ,

परत येईल माझी आई...

रुप गाईचे बघता

आठवण तुझी येते "आई" ,

कुनी सांगेल का मज 

कशी होती रे माझी आई...

पाणावले डोळे माझा

शब्द "आई" लिहतांना ,

तुला कधी बघितले नाही ,

जिवन मी जगतांना....

बाप माझा आहे

माझी चौकशी करत नाही ,

तुचं सांग आई मी

कुठे चुकलो काही...

समाजात एकट जगलो

लढलो या जिवनाशी ,

रक्ताचेच नाते आज

परके झाले माझ्याशी...

रडलो मी एकांतात

तुझा फोटो घेऊन ,

कधी परत येनार

तु माझी आई होऊन...

माणसांच्या गर्दित

आज काल हात कुनिच धरत नाही ,

वास्तवातिल दूनियेला

काहीच अर्थ उरत नाही...

कधी कधी अस वाटत

उगाच आलो जन्माला ,

कंटाळवाणे झाले जिवन

वाट लागली सरणाला..

सांगू कुनाकडे दू:ख

माझे ठाव मज नाही ,

कस विसरू तु सांग

अश्रू कुणी पुसलेच नाही...

ओळख जरी तुमची असली

मला कुनीचं ओळखत नाही ,

तरी माझा जिद्द

थांबली कुठेच नाही...

पुन्हा एकदा जन्म घ्यावा

आई तुझ्या पोटी ,

रडून सर्व दू:ख सांगाव

भरून तुझी ओटी...

आई तु असती तर

अश्रू आज आले नसते ,

माझे सर्व दू:ख

गिळून तु घेतले असते...

एकचं प्रर्थना देवाला

मला माझी आई दे ,

हवे तर आत्ताच प्रण माझे घे...

सुखरूप ठेव माझ्या आईला ,

प्रर्थना करतो देवा तुला...

फक्त तिला बोलायला सांग ,

"कुठे चुकलास रे माझ्या मुला"..!!

Miss you aai



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy