आई मला जगायचं होतं गं
आई मला जगायचं होतं गं
माझा जन्म झाला तू आनंदलीस
पण साऱ्याना मात्र दुःख झालं
अन् सगळ्यांच्या दुषणाना वैतागून
मला तर तू चुलीतच घातलंस
किती मरण यातना भोगाव्या लागल्या या जिवाला
अभागी ,करंटी म्हणुन दोष दिला मी माझ्या नशिबाला
माझा अपराध काय हे समजून घ्यायचं होतं गं
आईं मला जगायचं होतं गं
सारं जग पहायचं होतं गं
वात्सल्य, प्रेमाचा सागर आई तू जगी
कसा पाझर फुटला नाही तुझ्या हृदयी
कुठे गेली गं माणुसकी सारी
आईची ममताही आटून गेली सगळी
कधी गटारात कधी उकिरड्यावर फेकलं जातंय मला
एवढी का मी कचऱ्यासमान झाले या जगाला
मी कुठेच कमी पडणार नाही हे जगाला दाखवायचं होतं गं
आईं मला जगायचं होतं गं सारं जग पहायचं होतं गं
नसते गेले लग्न झाल्यावर तुम्हाला सोडून
घेतलं असतं तुमच्या सोबत सासरच्यानाही सांभाळून
नसते शोधले वृद्धाश्रम कधी तुमच्या साठी
बनून राहिले असते तुमच्या म्हातारपणाची काठी
या सुरकुतल्या हातांचा आशीर्वाद
मरेपर्यँत जपून ठेवायचा होता गं
आईं मला जगायचं होतं गं सारं अगं पाहायचं होतं गं
