मी जात मोडली बाई
मी जात मोडली बाई
मी जात मोडली बाई
मी जात मोडली बाई
मी जात मोडली बाई ॥धृ॥
नको मला हा अंधःकार
कैक पिढ्यांचा तिरस्कार
अक्राळविक्राळ हाहाकार
नजरेचा बलात्कार
संपवले सारे काही
मी जात मोडली बाई॥1॥
जातीने केला घात
कैक वर्ष काळी रात
बाबासाहेबांनी केली मात
ओठावर फुलले गीत
लीन तुझ्या पायी पायी
मी जात मोडली बाई॥2॥