Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Madhuri Sharma

Tragedy

4.0  

Madhuri Sharma

Tragedy

स्त्रीची सामाजिक दुरावस्था

स्त्रीची सामाजिक दुरावस्था

5 mins
223


काही कामासाठी मी मागच्या आठवड्यात नाशिकला गेले होते. सकाळी काम झाल्यावर सांयकाळी जरा निवांतच होते. तेव्हा मला एक फोन आला (नाव मी सांगु शकणार नाही)

त्या मँडम मला म्हणाल्या की तुझे नगाराला लेख वाचले आणि मग माझ्याविषयी विचारपुस करून त्यांनी मला विचारलं - तु माझ्या आयुष्याविषयी जरा लिहिणार का? मी म्हटलं का नाही मला लिहायला हरकत नाही पण ते प्रकाशित होईल याची मी तुम्हाला शाश्वती देऊ शकणार नाही त्यावर त्या मला म्हणाल्या तु मला भेट तरी माझ्याविषयी ऐकल्यावर वाटलं तर लिहायचं का नाही हे तु ठरव मग मी म्हटलं ठिक आहे आपण भेटुन बोलु.


मी त्यांना भेटायला त्यांच्या घरीच गेले. सलग सहा तास आम्ही बोलत होतो अर्थात त्याच बोलत होत्या मी फक्त ऐकत होते . जेव्हा त्या बोलायच्या थांबल्या तेव्हा आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी होते मला भरून आलं होतं. समाजाचा खरा चेहरा मला आज कळला होता. त्यांच्या हातां-पायांवर जखमा होत्या अर्थात त्यांचा कुठल्याही प्रकारचा अपघात झाला नव्हता तर त्यांच्या नवऱ्याने त्यांना मारहाण केली होती. गेली 29 वर्षे त्यांचा मानसिक,शारिरीक छळ होत आहे. एखाद्या सुशिक्षित घरात स्त्रीवर अत्याचार होतो. बायकोला इतकी टोकाची मारहाण केली जाते. मी सुन्न झाले होते , भयंकर राग येत होता, नुसतं ऐकल्यावर माझी ही अवस्था होती तर त्यांची काय अवस्था असेल याची आपण कल्पना देखील करु शकत नाही. आजही पुरूष स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि स्त्रीला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची मारहाण करतात आणि यांत पुरूषांना मोठेपणा वाटतो. आपल्याकडे स्त्रीयांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराला गैरवर्तन समजलंच जात नाही यापेक्षा वाईट आणि विचित्र मानसिकता काय असेल?

त्या मँडमाचं ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की जर स्त्रीचं शिक्षण पुरूषापेक्षा जास्त असेल, माहेरची परिस्थिती चांगली असेल आणि ती दिसायला सुंदर असेल तर पुरूषांना कमीपणा वाटतो आणि त्यातुनच तिला मारहाण करून, टोमणे मारून तिला कमी लेखण्याचा आणि स्वतःच्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न हे पुरूष करू लागतात. यांचा अर्थ असा की चांगलं शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना कौटुंबिक त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. त्या मँडमांना तर अगदी लहान-सान गोष्टीवरून त्यांचे पतिदेव मारहाण करतात म्हणजे त्यांच मोकळं वागणं-बोलणं त्यांच्या नवऱ्याला पटत नाही म्हणुन, त्यांना गप्प ठेवण्यासाठी आणि स्वतःच वर्चस्व गाजवण्यासाठी ते त्यांच्यांवर हात उचलतात आणि घरखर्चासाठी पैसे मागितले की शिविगाळ करतात राग आला तर बेदम मारहाण करतात. हे ऐकल्यावर मी कुठल्या शब्दांनी त्यांची सांत्वना करू शकले असते?

पण खरं म्हणजे प्रश्न मला हा पडला होता की त्या शिकलेल्या असतांना का म्हणुन ऐवढी वर्ष हा अत्याचार सहन करत आहेत? आज अनेक कायदे , स्त्रीयांच्या बाजूने असतांना असं काय आहे की ज्यामुळे त्यांनी गेली अनेक अर्थात 29 वर्षे अशा व्यक्तीबरोबर व्यतीत केली? मी त्यांना असं विचारल्यावर त्या मला म्हणाल्या की त्यांना आर्थिक पाठबळ नसल्यामुळे फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी त्या आजही कौटुंबिक हिंसा सहन करत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी, उज्जवल भविष्यासाठी त्या त्या़ंच्या नवऱ्याबरोबर राहत आहे. त्या माऊलीला खरंच माझं साष्टांग दंडवत प्रणाम. जी आजही त्या मुलासाठी मार खात आहे जो तिला तिने काही खर्चासाठी त्याच्याकडे पैसे मागितले असता तिला अपमानीत करतो. अर्थात त्यालाही माहित आहे की त्याचे वडील त्याच्या आईला कसं वागवतात. अंगाला काटा येतो कारण त्या नवऱ्याचं सोडा तो शिकलेला नाही पण तो मुलगा चांगला शिकलेला असुन सुध्दा त्यांच्या आईबरोबर असं वागतो. असं म्हटल्यावर आज आपण वैचारिक आणि सामाजिक पातळीवर अगदी खालच्या थराला जाऊन पोहचलो आहोत. कौटूंबिक अत्याचाराविषयी समाज हवा तेवढ्या गांभीर्याने विचार करत नाही. श्रीमंती,उच्च शिक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या ढोंगामागे आजही स्त्रीयांवर अत्याचार होतच आहेत. आई-वडीलांनी फक्त मुलींनी कसं वागावं हे शिकवताना, मुलांनाही मुलींशी कसं वागावं याचं शिक्षण दिलं पाहिजे. मुलं आक्रमक न बनता सभ्य कसे बनतील यांचे प्रयत्न केले गेले पाहिजे.

आपल्या समाजात स्त्री धर्म म्हणजे तिने घरात सगळ्यांना सांभाळून घ्यायचं. सर्वांच्या सुखात सुखी व्हायचं, सतत दुसऱ्यांना खुश ठेवण्याची मानसिकता तिच्यात निर्माण केली जाते आणि म्हुणनच जेव्हा तिचा असा घरगुती छळ केला जातो तेव्हा त्या स्त्रीला वाटतं आपण त्यांच्या मनासारखं वागलो नाही म्हणुन आपल्याला हा त्रास सहन करावा लागला असं मानुन असंख्य जणी स्वतःला दोषी मानायला लागतात. एका गैर सरकारी संस्थेनुसार भारतात जवळ-जवळ 5 करोड महिला कौटुंबिक हिंसेच्या बळी पडतात. स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही आज स्त्री स्वतःच्या घरात सुरक्षित नाही. बंद दरवाज्यामागे घडणाऱ्या या त्रासातुन मुक्तीचा मार्ग कसा सापडणार जेव्हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पूरावे मागितले जातात. कौटुंबिक हिंसेमुळे स्त्रीचा सन्मान कमी होतो. जिला घरात सन्मान नाही तिला बाहेर सन्मान कोण देणार? ती अत्याचार सहन करत असते पण कोणाला काही कळू देत नाही. अशा परिस्थित तिच्याकडे फक्त दोन पर्याय असतात एकतर त्रास सहन करत संसार टिकवायचा नाहीतर आत्महत्या करायची. जख्मी शरीर, दुःखी मन, असुरक्षित भविष्य, शारिरीक वेदना, हताश-निराश जीवन तरीही जगण्यासाठी मजबूर हे त्या मँडमांचं खंर अस्तित्व आहे. आणि ही अवस्था 21 व्या शतकात पण स्त्रियांची असेल तर कसला आलाय 'महिला दिन' स्त्री सबलीकरणावर भाषण देऊन फोटो काढण्यापूर्तीच माणुसकी उरली आहे का आपल्याकडे? किती संवेदनाहीन झालो आहोत आपण? जोपर्यंत स्त्रीची सामाजिक अवस्था बदलत नाही तिच्यावर होणारे अत्याचार थांबत नाही तोपर्यंत 'महिला दिन' हा फक्त एक देखावा आहे.

स्त्रीची सामाजिक अवस्था तेव्हाच बदलेल जेव्हा मुलांना स्त्रीचा आदर करण्याचा संस्कार त्यांच्या मनात रूजवला गेला असेल. एकवेळ मुलगा श्रीमंत नाही झाला तर चालेल पण तो एक चांगला माणुस तरी घडलाच पाहिजे. जो नुसता एक दिवस दाखवण्यापूरता नव्हे तर खरंच मनापासुन स्त्रीचा आदर करेल आणि तिच्या अस्तित्वाचं वास्तविक चित्र लवकरात लवकर बदलेल. मी त्या दिवशी त्या मँडमांना एवढचं म्हणु शकले की तुम्हाला जेव्हा ही एकटं वाटलं किंवा त्रास झाला तुम्ही मला सांगा मी तुम्हाला भेटायला नक्की येईन. त्यांच्यातला आत्मविश्वास हरवला आहे तो त्यांना पुन्हा मिळवुन देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अर्थात तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो की मी त्यांना त्या व्यक्तिला सोडून द्या हा सल्ला का नाही दिला? कारण त्यांना एक मुलगी आहे जिचं लग्न अजुन व्हायचं आणि म्हणुन त्या त्यांच्या नवऱ्याला सोडू शकत नाही. मूळात मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सोडण्यापेक्षा त्याला चांगलं वठणीवर आणायला पाहिजे.

हा लेख वाचल्यावर सामाजिक वैचारीक मानसिकता बदलेल एवढाच हा लेख लिहण्याचा माझा उद्देश आहे.

धन्यवाद....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy